भोसरीत दोन फ्लॅटमधून तब्बल ५५ हजारांचे सोन्या - चांदीचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 03:03 PM2021-08-08T15:03:56+5:302021-08-08T15:04:19+5:30

इंद्रायणी नगर मध्ये शनिवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

thief with gold and silver jewelery worth Rs 55,000 from two flats in Bhosari | भोसरीत दोन फ्लॅटमधून तब्बल ५५ हजारांचे सोन्या - चांदीचे दागिने लंपास

भोसरीत दोन फ्लॅटमधून तब्बल ५५ हजारांचे सोन्या - चांदीचे दागिने लंपास

Next

पिंपरी : भोसरीच्या इंद्रायणी नगर मधून अज्ञात चोरट्यांनी दोन फ्लॅटमधून दागिने लंपास केले. शनिवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. जगन्नाथ अर्जूनराव इकपल्ले (वय ४७, रा. सिद्धीविनायक पार्क, राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी याप्रकरणी शनिवारी भोसरी पोलीस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीन ते शनिवारी सकाळी अकराच्या दरम्यान इकपल्ले यांच्या राहत्या घराचा दरवाजा कुलूप लावून बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साह्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातून ३४ हजार ६०० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले.

तसेच इकपल्ले यांच्या सोसायटीच्या शेजारी असलेल्या लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीतील शार्दूल दीपक पंचवाडकर (वय ३४) यांच्या घरीसुद्धा चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी पंचवाडकर यांच्या घरातून २९ हजार ४०० रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने कपाटाचे नुकसान करून एकूण ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: thief with gold and silver jewelery worth Rs 55,000 from two flats in Bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.