गणपती विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या हाॅटेल व्यावसायिकाच्या घरात १४ लाखांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 09:51 IST2022-09-12T09:50:37+5:302022-09-12T09:51:59+5:30

१३ लाख ३५ हजारांचे दागिने आणि ५० हजारांची रोकड चोरी...

Theft of 14 lakhs in the house of a hotelier who went to Ganpati Visarjan procession | गणपती विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या हाॅटेल व्यावसायिकाच्या घरात १४ लाखांची चोरी

गणपती विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या हाॅटेल व्यावसायिकाच्या घरात १४ लाखांची चोरी

पिंपरी : गणपती विसर्जन मिरवणुकीत कुटुंबीयांसह गेलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे घर फोडले. या घरफोडीत चोरट्यांनी १३ लाख ३५ हजारांचे दागिने आणि ५० हजारांची रोकड चोरून नेली. साई चौक, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. ९) रात्री आठ ते शनिवारी (दि. १०) मध्यरात्री दीड या कालावधीत ही घटना घडली.

अजय मख्खनलाल बजाज (वय ४९, रा. साई चौक, पिंपरी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय बजाज हे हाॅटेल व्यावसायिक आहेत. फिर्यादी आणि त्यांच्या घरातील सर्वजण शुक्रवारी (दि. ९) रात्री आठच्या सुमारास घराला कुलूप लावून गणपती विसर्जन मिरवणुकीत गेले.

त्यानंतर शनिवारी (दि. १०) मध्यरात्री दीडच्या सुमारास फिर्यादी अजय बजाज घरी आले. त्यावेळी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी घरातील कपाटातून १३ लाख ३५ हजार रुपयांचे सोने आणि ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे उघडकीस आले.

Web Title: Theft of 14 lakhs in the house of a hotelier who went to Ganpati Visarjan procession