शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

चोरट्यांनी लांबवला तब्बल सव्वा लाखांचा ऐवज; पिंपरीमधील मोरवाडीतील प्रकार, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:43 PM

मोरवाडीतील लक्ष्मण रेसिडेन्सी या गृहसंस्थेत रविवारी दुपारी अडिचच्या सुमारास घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

ठळक मुद्देअज्ञात चोरट्याविरूद्ध दाखल झाला गुन्हा भरदिवसा घडला चोरीचा प्रकार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : मोरवाडीतील लक्ष्मण रेसिडेन्सी या गृहसंस्थेत रविवारी दुपारी अडिचच्या सुमारास घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी अविनाश सावंत यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण रेसिडेन्सीमधील बी विंग येथील सदनिकेत राहणाऱ्या सावंत यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून चोरटयांनी कपाटातील ऐवज पळविला. त्यामध्ये ३५ हजार रुपये रोख आणि दोन लाख ८५५ रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी पळविले. मोरवाडीत याच परिसरात राम प्रसाद श्रीराम गुप्ता यांच्या सदनिकेच्या दरवाजाचा कुलुप कोयंडा तोडुन चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यांनीही याबबत पोलिसांत तक्रार दिली आहे. मोरवाडी येथे जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या खोदाईचे काम सुरू आहे. या परिसरात रस्ते खोदाईच्या कामाच्या यंत्रांचा खडखडाट सुरू आहे, या परिस्थितीत कडी कोयंडा तोडफोडीचा आवाज कोणाला जाणार नाही, चोरट्यांनी फायदा उठविला आहे. भरदिवसा हा चोरीचा प्रकार घडला आहे. 

टॅग्स :theftचोरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड