पिंपरी चिंचवड: भोसरी परिसरात एका धाडसी घटनेत स्थानिक रहिवाशांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता एका सराईत घरफोड्याला रंगेहाथ पकडले आहे. पकडलेला आरोपी जालना येथील असून, त्याचा दुसरा साथीदार मात्र पिस्तूलाचा धाक दाखवून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
भोसरी (पिंपरी चिंचवड) येथे जालना येथील सराईत गुन्हेगार सागर सिंग सुरत सिंग उर्फ फंटास्टिक बावरी अंधरेले (वय 27 रा - गुरुगोविंदसिंगनगर जालना) याने व त्याच्या सोबतच्या अज्ञात आरोपीने राहत्या घरी फ्लॅटची कडी काढून व लॅच कशाच्यातरी सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे ड्रॉवर व लाकडी कपाटातील लॉकर कशाच्या तरी सहाय्याने उचकटून रोख रक्कम व चांदीची नाणी, असे घरफोडी करून चोरी करून पुन्हा मोटारसायकलची चोरी करून मोटारसायकलवरून पसार झाला. मोटारसायकल वरून पळून जात असताना मोठे साहस दाखवत तेथील रहिवासी सचिन पिंगळे, चेतन वारुळे, ताज शेख, उमेश वाल्हे, सुधीर वाघ, जोतीराम भोसले, गोपाळ कुलकर्णी, बिल्डिंगचे सिक्युरिटी यांचे नातेवाईक नामे ध्वजशेर शाही व इतर इसम यांनी सागर सिंग याला पकडले. पण दुसरा आरोपी हा पिस्तूलाचा धाक दाखवून पळून गेला. सदर झटापटीत ध्वजशेर शाही हे हाताच्या बोटाला चाकू लागून जखमी झाले आहेत. सदर बाबत भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस पथक तपास करत आहे.
Web Summary : In Bhosari, residents bravely caught a seasoned burglar from Jalna. His accomplice escaped, brandishing a pistol. During the struggle, one resident was injured. Police are investigating the theft of cash and silver coins after a flat was broken into.
Web Summary : भोसरी में, निवासियों ने बहादुरी से जालना के एक अनुभवी चोर को पकड़ा। उसका साथी पिस्तौल लहराते हुए भाग गया। हाथापाई में एक निवासी घायल हो गया। पुलिस एक फ्लैट में सेंधमारी के बाद नकदी और चांदी के सिक्के की चोरी की जांच कर रही है।