दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी; सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर देखील पळवला

By नारायण बडगुजर | Updated: May 26, 2024 14:52 IST2024-05-26T14:51:40+5:302024-05-26T14:52:12+5:30

दुकानाशेजारील इतर दुकानांचे सीसीटीव्ही देखील तोडून नुकसान केले

The theft of jewelery worth 29 lakhs by breaking the shutters of the shop CCTV cameras were broken and DVRs were also stolen | दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी; सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर देखील पळवला

दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी; सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर देखील पळवला

पिंपरी : शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातून २९ लाखांचे सोन्याचांदीचे दागिनेचोरून नेले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान करून डीव्हीआर देखील लंपास केला. प्राधिकरण निगडी येथील पेठ क्रमांक २५ मधील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स नावाच्या दुकानामध्ये शुक्रवारी (दि. २४) रात्री साडेनऊ ते शनिवारी (दि. २५) सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. 

संदीप छगनराव बुहाडे (५०, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप बुहाडे यांचे प्राधिकर निगडीमध्ये श्रीलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाचे शटर अर्धवट वाकवून अर्धवट उघडे करून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील तिजोरी तोडून २० लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच नऊ लाख रुपये किमतीचे १० किलो चांदीचे दागिने, १८ हजारांची रोकड तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा एक हजार रुपये किमतीचा डीव्हीआर चोरून नेला. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कट करून नुकसान केले. तसेच फिर्यादी संदीप यांच्या दुकानाशेजारील इतर दुकानांचे सीसीटीव्ही देखील तोडून नुकसान केले. सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख तपास करीत आहेत.

Web Title: The theft of jewelery worth 29 lakhs by breaking the shutters of the shop CCTV cameras were broken and DVRs were also stolen