Fire In Pimpari: फायनान्स कंपनीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 17:36 IST2021-10-06T17:36:25+5:302021-10-06T17:36:34+5:30
जीवीतहानी झाली नसून अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली

Fire In Pimpari: फायनान्स कंपनीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग
पिंपरी : डांगे चौकातील एका फायनान्स कंपनीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात कसलीही जीवीतहानी झाली नसून अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली . अग्निशामक अधिका-यांने दिलेल्या माहितीनूसार सकाळी पावणेदहाच्या सुमारास रहाटणीच्या अग्निशामक दलास आगीची वर्दी मिळाली.
अग्निशामक दलाच्या पिंपरी विभागाच्या २ गाड्या, प्राधिकरण विभागाची १ गाडी, रहाटणी विभागाची १ गाडी अशा एकूण ४ गाड्यासहव २० कर्मचा-यांनी आगिच्या ठिकाणी दाखल झाले. दिड तासांच्या अथक प्रयत्नांने आग विझवण्यात आली.
तसेच आळंदी रोडवर मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या भोसरी विभागास वर्दी मिळाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.