तळेगाव दाभाडे: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 07:55 PM2023-07-12T19:55:43+5:302023-07-12T19:56:51+5:30

अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल...

Talegaon Dabhade: Pedestrian killed in collision with vehicle on old Pune-Mumbai highway | तळेगाव दाभाडे: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

तळेगाव दाभाडे: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

पिंपरी : अज्ञात वाहनाच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी (दि. ११) रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिस नाईक किरण मदने यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथील काळोखे पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Talegaon Dabhade: Pedestrian killed in collision with vehicle on old Pune-Mumbai highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.