CA Result 2022: सीए परीक्षेत अपयश आल्याने पिंपरीतील २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 18:38 IST2022-02-11T18:38:11+5:302022-02-11T18:38:28+5:30
परीक्षेत अपयश आल्याने नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

CA Result 2022: सीए परीक्षेत अपयश आल्याने पिंपरीतील २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या
पिंपरी : सीए परीक्षेत अपयश आल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तरुणीने राहत्या घरी केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी केशवनगर, चिंचवड येथे घडली. पल्लवी संजय जाधव (वय २४, रा. केशवनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी सीए अभ्यासक्रमाचा अभ्यास करीत होती. यापूर्वी दोन वेळा सीएची परीक्षा दिली. मात्र, दोन्ही वेळेला तिला अपयश आले. मागील वेळी तिने तिसऱ्यांदा सीएची परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच लागला आहे. मात्र, या वेळीही अपयश आल्याने नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.