शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यानं 'फी माफीसाठी' डोकं आपटून फोडली प्राचार्य कक्षाच्या दरवाजाची काच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 21:09 IST

पिंपरीतील घटना : विद्यार्थ्यासह महाविद्यालयातील कर्मचारी जखमी

ठळक मुद्देशिक्षक किंवा कर्मचारी यांनी कोणीही विद्यार्थ्याला मारहाण केली नसल्याचं महाविद्यालयाच्या पत्रकात नमूद

पिंपरी : महाविद्यालयाच्या शैशक्षणिक शुल्क (फी) माफ करावे, अशी मागणी करीत विद्यार्थ्याने प्राचार्यांच्या कक्षाच्या दरवाजावर डोके आपटले. यात दरवाजाची काच फुटून विद्यार्थ्यासह महाविद्यालयातील एक कर्मचारी जखमी झाला. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी गाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात बुधवारी  दुपारी ही घटना घडली. 

सुरेश देसाई, असे जखमी झालेल्या महाविद्यातील कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यासह विद्यार्थी जखमी झाला आहे. महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्धी पत्रक देण्यात आले. जखमी विद्यार्थी हा त्याच्या वर्गमित्रासह प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्या कक्षामध्ये आला. त्यावेळी फी माफीविषयी वाद झाला. दरम्यान विद्यार्थ्याने प्राचार्यांच्या कक्षाच्या दरवाजावर स्वत:चे डोके आपटून दरवाजाची काच फोडली. यात त्या विद्यार्थ्यासह कर्मचारी सुरेश देसाई जखमी झाले. त्यानंतर विद्यार्थ्याने काचेचा तुकडा घेतला आणि बाहेर गेला. काही गैरप्रकार घडू नये म्हणून महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला धरून आणले तसेच पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत त्याला थांबविले. यात संबंधित विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे शिक्षक किंवा कर्मचारी यांनी कोणीही मारहाण केलेली नाही, असे महाविद्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात काही जणांची गर्दी दिसत असून, एकाचा मोठ्याने रडण्याचा आवाज येत आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कक्षातील सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले आहे. त्यात प्राचार्य, शिक्षक तसेच इतर काही जण आहेत. एक विद्यार्थी त्यांच्याशी बोलताना अचानक दरवाजावर डोके आपटत आहे. त्यामुळे दरवाजाची काच फुटून विद्यार्थ्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे.

''महाविद्यालयात फीवरून वाद झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार केले. याप्रकरणी तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी सांगितले.''

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAccidentअपघातEducationशिक्षणStudentविद्यार्थी