मुलाचा मोबाईल बघितला म्हणून पत्नीवर केले चाकूने वार; आई गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 14:34 IST2021-11-03T14:34:47+5:302021-11-03T14:34:55+5:30

पत्नी मोबाईल बघत असल्याचा पतीला आला होता राग

stabbed his wife as he saw the childs mobile Mother seriously injured | मुलाचा मोबाईल बघितला म्हणून पत्नीवर केले चाकूने वार; आई गंभीर जखमी

मुलाचा मोबाईल बघितला म्हणून पत्नीवर केले चाकूने वार; आई गंभीर जखमी

पिंपरी : पत्नी मोबाईल बघते म्हणून चाकूने वार करून तिला जखमी केले. याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे मंगळवारी (दि. २) सायंकाळी ही घटना घडली.

दिलीप बाबुराव मोरे (वय ४५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय दिलीप मोरे (वय २१) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप हा अक्षय यांचा पिता आहे. अक्षय यांची आई मोबाईल बघत होती. त्याचा दिलीपला राग आला. चिडून त्याने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने अक्षयच्या आईवर वार केले. यात फिर्यादीची आई गंभीर जखमी झाली.

Web Title: stabbed his wife as he saw the childs mobile Mother seriously injured