शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

आईसाठी चहा आणायला गेलेला मुलगा परतलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 4:33 PM

आईला बेवारस सोडून दोघा मुलांनी केले पलायन

ठळक मुद्देवायसीएममधील घटना : ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ने केले पुनर्वसन रुग्णांना बेवारस सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले

प्रकाश गायकर पिंपरी : आईची प्रकृती अचानक बिघडली म्हणून स्वत:च्या वाहनातून आईला यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. वयामुळे सांधेदुखी व स्मृतिभ्रंश झालेल्या आईवर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पोटच्या दोन मुलांसोबत सुनेनेही तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने आईला हायसे वाटत होते. मात्र सायंकाळी ‘आई तुझ्यासाठी चहा आणतो’ असे बोलून गेलेला मुलगा दोन महिन्यांनंतरही आईला भेटायला फिरकली नाहीत. त्यामुळे आई आजही वायसीएममधील जनरल रुग्णांच्या वॉर्डमध्ये मुलांची वाट पाहत आहे.   मीरा भालचंद्र म्हेत्रे (वय ७५) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत घडलेली हकीगत अशी, १७ सप्टेंबर या दिवशी वृद्ध महिलेला अचानक सांधेदुखीचा जास्त त्रास होऊ लागला. उठणे बसणे कठीण होऊ लागले. त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनेने त्यांना रामवाडी, येरवडा येथून स्वत:च्या वाहनातून वायसीएम येथे आणले. सकाळी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांची तब्येत नाजूक असून त्यांना काही दिवस रुग्णालयातच भरती करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी मुलांना सांगितले. दोन्ही मुलांनी डॉक्टरांना तुमच्या पद्धतीने उपचार करण्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला रुग्णालयात भरती करून घेत, जनरल वॉर्डमध्ये औैषधोपचार सुरू केले. दुपारी एका मुलाने व सुनेने आईला ‘पुन्हा आमच्या घरी येऊ नको’ असे म्हणत दम दिला. त्यानंतर दोघेही रुग्णालयातून बाहेर गेले. सायंकाळच्या वेळेस दुसरा मुलगा ‘आई मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो’ असे बोलून निघून गेला. मात्र आता दोन महिने होत आले तरीही घरच्या एकाही व्यक्तीने आईची भेट घेतली नाही. चहा आणण्यासाठी गेलेल्या मुलाची आई अजूनही वाट पाहत आहे. मात्र चांगल्या सधन घरातील लोकही अशाप्रकारे आई-वडिलांना वाºयावर सोडत असल्याचे यामुळे समोर आले आहे. ......अशाप्रकारे रुग्णांना बेवारस सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या घटनेमध्ये दोघा मुलांनी संगनमत करून रुग्णालयामधून पळ काढला आहे. वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी ही नवीन पिढी घेत नाही. अशाप्रकारे बेवारस सोडून जाणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. या घटनेतील मुलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’’- एम. ए. हुसैैन, संस्थापक, रिअल लाइफ रिअल पीपल. वायसीएम रुग्णालयातील ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ या संस्थेने या वृद्ध महिलेची जबाबदारी स्वीकारली. दोन महिने या महिलेची देखभाल केली. यामध्ये समाजसेवक महादेव बोत्रे, कुंडलिक आमले, रेणुका शिंदे, उल्हास चांगण, आकाश शिरसाट, मिलिंद माळी, दत्ता वाघमारे यांनी महिलेची शुश्रुषा केली. तसेच या महिलेच्या मुलांना शोधण्यासाठीही संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटल