सीसीटीव्हीवर स्प्रे मारून कपाटातील सहा लाख रुपये चोरले; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:35 IST2022-10-31T12:33:20+5:302022-10-31T12:35:02+5:30

पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे...

Six lakh rupees stolen from cupboard by spraying on CCTV; Filed a case | सीसीटीव्हीवर स्प्रे मारून कपाटातील सहा लाख रुपये चोरले; गुन्हा दाखल

सीसीटीव्हीवर स्प्रे मारून कपाटातील सहा लाख रुपये चोरले; गुन्हा दाखल

पिंपरी : पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्हीवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून घरात प्रवेश करत, सहा लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री साडेदहा ते शनिवारी (दि.२९) सकाळी आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी सागर गजानन कामठे (वय ३७, रा.पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असलेल्या बंद सीसीटीव्हीवर काळ्या रंगाचा स्प्रे चोरट्याने मारला. त्यानंतर बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर फिर्यादीच्या प्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून प्लॅटमध्ये प्रवेश करत, बेडरूममधील कपाट ठेवलेले सहा लाख रुपये चोरट्याने चोरून नेले.

Web Title: Six lakh rupees stolen from cupboard by spraying on CCTV; Filed a case