दुकानदाराला मारहाण; भाजपा नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 21:51 IST2018-06-04T21:51:48+5:302018-06-04T21:51:48+5:30

भाजपचे नगरसेवक संजय नेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवासी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दुकानाची तोडफोड केली.

Shopkeeper beaten; The criminal complaint against BJP corporator | दुकानदाराला मारहाण; भाजपा नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल 

दुकानदाराला मारहाण; भाजपा नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल 

ठळक मुद्देगळ्यातील सोनसाखळी आणि कानातील सोन्याची बाळी गायब

पिंपरी  : दुकानाची तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक संजय नेवाळे यांच्यावर तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या सात जणांविरुद्ध दुकानदाराने फिर्याद दाखल केली आहे. दुकानाची तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास चिखली शिवतेजनगर येथे घडली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय नेवाळे, सचिन किरवे, स्वप्नील इतर चार अनोळखी व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. बदाराम भिकाजी देवासी (वय २४, रा.  शिवतेजनगर, चिखली. मूळगाव राजस्थान) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवासी हे स्वीट मार्टमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या दुकानासमोर चायनीज, ज्यूस आणि पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे. रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास नेवाळे कार्यकर्त्यांसह तेथे आले. त्यांनी देवासी यांना चायनीज, पाणीपुरी आणि ज्यूस सेंटर हे दुकानासमोर लावायचे नाही, असे सांगितले. देवासी यांनी दुकान मालकाला फोन करून नेवाळे यांचा निरोप दिला,   त्यावेळी नेवाळे यांच्याबरोबर आलेल्या एकाने देवासी यांच्या कानशिलात मारली. दुकान मालकाला वेगळे सांगत असल्याचा राग आल्याने संजय नेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवासी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत दुकानाची तोडफोड केली. यावेळी देवासी यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि कानातील सोन्याची बाळी गहाळ झाली. असे फिर्यादीत नमूद केले आहे

Web Title: Shopkeeper beaten; The criminal complaint against BJP corporator