शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! भाई न म्हणल्याने तरुणाला खायला लावली जमिनीवरची बिस्कीटे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 9:20 PM

भाई न म्हणाल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारासह त्याच्या चार साथीदारांनी तरूणाला कमरेचा बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.

पिंपरी : भाई न म्हणाल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारासह त्याच्या चार साथीदारांनी तरूणाला कमरेचा बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. जमिनीवर बिस्किटे टाकुन ती खाण्यास भाग पाडली. हा खळबळजनक प्रकार थेरगावातील गणेशनगर येथे घडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा संतापजनक प्रकार समोर आला. रोहन वाघमारे या सराईतासह प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

आरोपी रोहन हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता. आरोपी रोहन याने फिर्यादी तरूणाला मोबाईलवर कॉल करून शिवीगाळ केली आणि भेटण्यास बोलविले. त्यानुसार, तरूण मंगळवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास गेला. तरूणाने रोहनला तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत रोहनने तरूणाला शिवीगाळ केली. तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. इतर आरोपींनीही तरूणाला शिवीगाळ करत बेल्टने व लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक