धक्कादायक! पिंपरीत घरभाडं मागितल्यानं घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 14:27 IST2021-09-03T14:27:26+5:302021-09-03T14:27:42+5:30

आठ महिन्यांचे घरभाडे थकल्याने ते मागण्यासाठी गेल्याने केला हा प्रकार

Shocking! Asking for rent in Pimpri, the landlord's son was pushed from the fourth floor | धक्कादायक! पिंपरीत घरभाडं मागितल्यानं घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकललं

धक्कादायक! पिंपरीत घरभाडं मागितल्यानं घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकललं

ठळक मुद्देमुलगा गंभीर जखमी झाल्याचे आले समोर

पिंपरी : आठ महिने भाडं थकल्याने भाडेकरू कुटुंबाकडे घरमालक आणि त्यांच्या मुलाने भाडं मागितलं. त्यावरून भाडेकरू कुटुंबाने घरमालक आणि त्यांच्या मुलाला घराच्या टेरेसवर नेऊन मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भाडेकरू कुटुंबावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ ऑगस्टला रात्री साडेआठ वाजता सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे घडली.

विजय पाटोळे, त्याची पत्नी, मुलगी आणि साहिल विजय पाटोळे (सर्व रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सचिन शिवदास पोरे (वय ५० , रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी गुरुवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा सौरभ या घटनेत जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुटुंब पोरे यांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहत आहे. मागील आठ महिन्यांचे घरभाडे थकल्याने ते मागण्यासाठी पोरे आणि त्यांचा मुलगा सौरभ गेले. पैसे मागितल्याचा राग आल्याने कुटुंबाने त्यांना आणि त्यांच्या मुलाला घराच्या टेरेसवर बोलावलं. टेरेसवर शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून सौरभला चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यामध्ये सौरभ गंभीर जखमी झाला आहे.

Web Title: Shocking! Asking for rent in Pimpri, the landlord's son was pushed from the fourth floor