पिंपरी-चिंचवडमध्ये घटस्फोटित महिलेवर बलात्कार; फेसबुकवरून झाली होती ओळख
By नारायण बडगुजर | Updated: July 19, 2022 14:44 IST2022-07-19T14:42:30+5:302022-07-19T14:44:56+5:30
आरोपीविरोधात गुन्हा दाखल...

पिंपरी-चिंचवडमध्ये घटस्फोटित महिलेवर बलात्कार; फेसबुकवरून झाली होती ओळख
पिंपरी : फेसबुकवर ओळख झालेल्या एकाने घटस्फोटित महिलेशी मैत्री केली. त्यानंतर जवळीक साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार जानेवारी २०१८ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत सांगवी, विमाननगर, बालेवाडी येथे घडला.
अजय रमेश बोतालजी (वय ४७, रा. बिबवेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय पीडित महिलेने सोमवारी (दि. १८) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा घटस्फोट झाला आहे. दरम्यान आरोपी आणि फिर्यादी यांची फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांशी ओळख झाली. त्याद्वारे आरोपीने फिर्यादींसोबत मैत्री करून जवळीक साधली. फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.