Pune Crime | पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 17:29 IST2023-01-12T17:26:37+5:302023-01-12T17:29:04+5:30
याप्रकरणी पीडित महिलेची भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद...

Pune Crime | पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर संबंध तोडून टाकण्याची धमकी दिली. ही घटना २०२२ मध्ये पिंपरी आणि भोसरी येथे घडली. आदर्श राजकुमार सिंग (वय २३, रा. भोसरी. मूळ रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. ११) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे बोलून आरोपीने महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. त्यासाठी महिलेने नकार दिला. तरीही आरोपीने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर तुझ्याशी संबंध तोडून टाकीन, अशी धमकी आरोपीने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.