देहूरोड परिसरात सोळा वर्षाच्या मुलाने केला ९ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 18:03 IST2022-02-28T17:57:21+5:302022-02-28T18:03:32+5:30

पीडित अल्पवयीन मुलाच्या आईची फिर्याद...

sexual abuse of a nine year old boy in dehu road area crime news | देहूरोड परिसरात सोळा वर्षाच्या मुलाने केला ९ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

देहूरोड परिसरात सोळा वर्षाच्या मुलाने केला ९ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

पिंपरी : नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला. देहूरोड परिसरात ऑक्टोबर २०२१ पासून वेळोवेळी हा प्रकार घडला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने याप्रकरणी रविवारी (दि. २६) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या नऊ वर्षीय मुलाकडून १६ वर्षीय मुलाच्या मामाची नंबर प्लेट तुटली होती. तुमचे घर व गाडी विकली तरी ती येणार नाही, तुझ्या मम्मी व पप्पाला माझा मामा घरात घुसून हानेल, असे १६ वर्षीय मुलाने पीडीत मुलाला सांगितले. त्यानंतर १६ वर्षीय मुलाने पीडीत नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: sexual abuse of a nine year old boy in dehu road area crime news