अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडित मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस; भोसरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 20:21 IST2021-08-03T20:20:03+5:302021-08-03T20:21:02+5:30

अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस

Sexual abuse of a minor girl; open incident exposed due to pregnancy | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडित मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस; भोसरीतील घटना

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडित मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस; भोसरीतील घटना

पिंपरी : जेवण वाढण्याच्या बहाण्याने घरात बोलावून एका ३० वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना मार्च ते एप्रिल २०२१ या कालावधीत संत तुकाराम नगर, भोसरी येथे घडली.

याबाबत पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत ३० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक पद्म सिंग (वय ३०, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी याने ११ वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला जेवण वाढण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले. तसेच पीडित मुलीच्या घरात झोपण्याचा बहाणा करून तिच्यावर पाच ते सहा वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली. मात्र,अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Sexual abuse of a minor girl; open incident exposed due to pregnancy