पैसे आणि खाऊचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; ६८ वर्षांच्या नराधमाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 21:29 IST2021-03-30T21:29:32+5:302021-03-30T21:29:42+5:30
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भोसरीत ज्येष्ठ नागरिकाला ठोकल्या बेड्या..

पैसे आणि खाऊचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; ६८ वर्षांच्या नराधमाला अटक
पिंपरी : अल्पवयीन मुलीला पैसे व खाऊचे अमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिला मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ६८ वर्षांच्या नागरिकाला अटक केली आहे. ही घटना भोसरी येथील बालाजीनगर मध्ये सोमवारी (दि. २९) दुपारी घडली होती.
सावन गंगाराम डोळस (वय ६८, रा. बालाजीनगर, भोसरी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दहा वर्षाच्या मुलीस आरोपी डोळस याने चॉकलेट व पैशाचे अमिष दाखविले. त्यानंतर मुलीस झुडपामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला मारण्याची धमकीही दिली.