रावेतला बीआरटी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 16:46 IST2018-09-05T16:45:16+5:302018-09-05T16:46:05+5:30

सांगवी-किवळे बीआरटी मार्गावर रावेत येथील भोंडवे वस्ती भागात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

Road accident Rawet: one killed and two injured | रावेतला बीआरटी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी 

रावेतला बीआरटी मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी 

किवळे : सांगवी-किवळे बीआरटी मार्गावर रावेत येथील भोंडवे वस्ती भागात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर रावेत येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  उस्मान अली शेख (वय 38, रा पवारनगर ,थेरगाव  ) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव असून विजयकुमार अरविंदकुमार ( वय 19 ) व फरहान खान ( वय 19 , दोघे राहणार विकासनगर , किवळे ) हे दोघे अपघातात जखमी झाले आहेत. 

        देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  विकासनगर ( किवळे ) येथील अक्सा मस्जिदचे मौलाना उस्मान अली शेख हे दुचाकीवरून रावेतबाजूकडून  विकासनगरच्या दिशेने येत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीची जोरदार धडक बसली.या अपघातात  शेख हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित करण्यात आले. दुसऱ्या दुचाकीवरील दोघे युवकही अपघातात जखमी झाले असून त्यांना रावेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Web Title: Road accident Rawet: one killed and two injured