शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘लय भारी गेम शो’ने आनंद द्विगुणित

By admin | Updated: October 12, 2016 02:05 IST

खास नवरात्रोत्सवानिमित्त लोकमत सखी मंच व कात्रज दूध यांच़्या वतीने महिलांसांठी लय भारी गेम शो घेण्यात आला. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने लय भारी गेम

पिंपरी : खास नवरात्रोत्सवानिमित्त लोकमत सखी मंच व कात्रज दूध यांच़्या वतीने महिलांसांठी लय भारी गेम शो घेण्यात आला. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने लय भारी गेम शोच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवात महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत उत्साहाचे वातावरण निर्माण केले. निगडीतील यमुनानगर व रुपीनगर येथील गुरुदत्त हौसिंग सोसायटीमध्ये लय भारी गेम शो झाला. स्त्रीशक्तीला अभिवादन करूनच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. त्यामध्ये रस्सीखेच, तळ्यात-मळ््यात, बॉल बकेटमध्ये टाकणे, केसात स्ट्रॉ माळणे आदी खेळ घेण्यात आले. खुर्चीत बसून फुगा फोडणे या सासू-सून जोडीच्या खेळ स्पर्धेत प्रथमच सून आणि सासरेबुवा यांची जोडी पाहायला मिळाली. या वेळी सहभागी सासऱ्यांनी सुनेसाठी या स्पर्धेत सहभाग घेतल्याचे सांगितले. तसेच, स्पर्धक सासूंच्या जोडीला टक्कर देत सून-सासरे यांच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. यानंतर पिठातून चॉकलेट शोधून काढणे या स्पर्धेत तर स्पर्धकाचा पिठाने भरलेला चेहरा बघण्यासारखा झाला होता. या अवतारातच त्यांनी केलेला रॅम्प वॉकही मजेशीर ठरला. प्रत्येक स्पर्धेत महिलांनी उत्साहाने, जोशाने आपला सहभाग नोंदविला. सूत्रसंचालकाच्या हजरजबाबी व उत्कृष्ट संवादकौशल्याने महिला खेळातील जिंकणे-हारणे, रुसवा-फुगवा विसरून खेळाचा मनसोक्त आनंद घेत होत्या. कार्यक्रमाच्या अखेर लकी ड्रॉ कुपन घेण्यात आले. नवरात्रीच्या नऊ दिवस घेतलेल्या लय भारी गेम शोचा हा अंतिम टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. नऊ दिवस शहरातील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले. प्रत्येक सोसायटीमध्ये महिलांचा भेटणारा प्रतिसाद भारावून टाकणारा होता. (प्रतिनिधी)