टवाळखोरांचे धाडस वाढले, पोलिसाला परिवारासमोरच मारहाण; मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील घटना

By रोशन मोरे | Published: September 1, 2023 05:24 PM2023-09-01T17:24:00+5:302023-09-01T17:25:30+5:30

ही घटना मुंबई-बेंगळुरू महामार्गावर बावधन येथे घडली...

refugees got bolder, beat the policeman in front of the family; Incident on Mumbai-Bengaluru route | टवाळखोरांचे धाडस वाढले, पोलिसाला परिवारासमोरच मारहाण; मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील घटना

टवाळखोरांचे धाडस वाढले, पोलिसाला परिवारासमोरच मारहाण; मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील घटना

googlenewsNext

पिंपरी : पत्नी आणि मुलांसोबत कारने जात असलेल्या पोलिसाला तिघांनी मिळून मारहाण करत कारचे नुकसान केले. तसेच पोलिस कर्मचाऱ्याच्या खिशातील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना मंगळवारी (दि.२९) रात्री दहाच्या सुमारास मुंबई-बेंगळुरू महामार्गावर बावधन येथे घडली. या प्रकरणी राहुल पोपट दडस (३३, रा.अंधेरी पूर्व, मुंबई) यांनी मंगळवारी (दि. २९) रात्री हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गणेश सुभाष घाडगे (२४), उमेश विजय सूर्यवंशी (२५, दोघे रा.रावेत), कौस्तुभ शिरीष काळे (२५, रा.थेरगाव) या संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दडस हे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. ते पत्नी मुलांसोबत मुंबई-बेंगळोर महामार्गावरुन जात होते. बावधन येथे एका हॉटेलसमोर संशयित आरोपींशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यावरून दडस यांना संशयितांना मिळून मारहाण केली. दडस यांनी आपण पोलिस कर्मचारी असल्याचे सांगितले. मात्र, तिघे मारहाण करण्याचे थांबले नाही त्यांनी दडस यांना शिवीगाळ करत कारचे नुकसान केले. हिंजवडी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी करत संशयितांना ताब्यात घेतले.

Web Title: refugees got bolder, beat the policeman in front of the family; Incident on Mumbai-Bengaluru route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.