तीन वर्षीय मामे बहिणीवर १७ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार; तळेगाव दाभाडे येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 15:31 IST2021-07-03T15:23:57+5:302021-07-03T15:31:39+5:30

तळेगाव दाभाडे येथील घटना 

Rape on sister by 17 year old brother ; Crime registred in Talegaon Dabhade police station | तीन वर्षीय मामे बहिणीवर १७ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार; तळेगाव दाभाडे येथील घटना 

तीन वर्षीय मामे बहिणीवर १७ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार; तळेगाव दाभाडे येथील घटना 

पिंपरी : तीन वर्षीय मामेबहिणीशी लैंगिक चाळे करून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी (दि. १) रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. 

पीडित चिमुरडीच्या आईने याप्रकरणी शुक्रवारी (दि. २) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानसुार १७ वर्षीय विधीसंघर्षीत बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी महिला ही विधीसंघर्षीत बालकाची मामी आहे. फिर्यादी महिला गुरुवारी रात्री घरात टीव्ही पाहत असताना त्यांचा भाचा असलेला विधीसंघर्षीत बालक फिर्यादीची तीन वर्षीय मुलगी व फिर्यादीची पुतणी यांना खेळण्याच्या बहाण्याने सोसायटीतील गार्डनमध्ये घेऊन गेला. तेथे फिर्यादी महिलेच्या मुलीशी लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी विधीसंघर्षीत बालकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Rape on sister by 17 year old brother ; Crime registred in Talegaon Dabhade police station