Pune| फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला धमकी देत केला बलात्कार; पिंपरी-चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 20:50 IST2022-01-31T20:44:59+5:302022-01-31T20:50:07+5:30
महिलेला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार...

Pune| फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला धमकी देत केला बलात्कार; पिंपरी-चिंचवडमधील घटना
पिंपरी : तरुणाने फेसबुकवरून महिलेशी ओळख केली. त्यानंतर हाॅटेलवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिचे फोटो, व्हडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. वाकड आणि आंबेगाव येथे जानेवारी २०२१ ते ३० जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
आर्यन शेख (वय २८, रा. वारणा, परभणी, सध्या रा. वाकड), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर फिर्यादी महिलेला वाकड आणि आंबेगाव येथील हॉटेलमध्ये नेले. महिलेला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
तुझे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेल, तुझ्या मुलीचे भविष्य खराब करेल, अशी धमकी आरोपीने दिली. पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.