धक्कादायक! पिंपरीत अल्पवयीन मुलीवर मंदिरात बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 09:58 IST2018-06-13T18:18:14+5:302018-06-14T09:58:54+5:30

खेळण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय पीडित मुलीला आरोपीने मंदिरात नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

rape on Minor girl in temple at pimpri | धक्कादायक! पिंपरीत अल्पवयीन मुलीवर मंदिरात बलात्कार

धक्कादायक! पिंपरीत अल्पवयीन मुलीवर मंदिरात बलात्कार

ठळक मुद्देपिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी: खराळवाडीतील एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी भरदिवसा घडली असून अत्याचार करणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आठ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन भांडेकर (वय १८, रा. पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. त्यास १८ तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.पीडित मुलगी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास खराळवाडी येथील एका मंदिरात खेळण्यासाठी गेली होती. आरोपीने तिला मंदिरात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने हा प्रकार घरी जाऊन आईला सांगितला. त्यावरून आईने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी फरार झाला होता. पिंपरी पोलिसांनी भांडेकर याचा कसून शोध घेत त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
 

Web Title: rape on Minor girl in temple at pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.