सांगवी : भावकीतील व्यक्तींनेच ब्लॅकमेल करून केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 14:52 IST2022-05-13T14:44:19+5:302022-05-13T14:52:40+5:30

फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावातील...

rape by blackmailing by the person in the relationship old sangvi pune crime news | सांगवी : भावकीतील व्यक्तींनेच ब्लॅकमेल करून केला बलात्कार

सांगवी : भावकीतील व्यक्तींनेच ब्लॅकमेल करून केला बलात्कार

पिंपरी : भावकीतील व्यक्तींनेच एका २० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना ऑगस्ट २०२१ ते ११ मे २०२२ या कालावधीत आनंदनगर जुनी सांगवी येथे घडली. या प्रकरणी संबंधित मुलीने गुरूवारी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर सदाशिव चौरे ( वय २२) रा. तुकुची वाडी, पोस्ट जिवाची वाडी, ता. केज, जिल्हा बिड ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावातील आहे. तसेच एकाच भावकीतील आहेत. सांगवी येथे मागील तीन महिन्यांपासून आरोपी आणि फिर्यादी एकत्र राहत होते. आरोपीने जबरदस्ती फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादी यांचे फोटो काढले.

आरोपीने फिर्यादी यांना ब्लॅकमेल करून वांरवार शारीरीक संबंध ठेवले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीसांची टिम पाठवण्याची तजवीज ठेवली असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Web Title: rape by blackmailing by the person in the relationship old sangvi pune crime news