जर पैसे दिले नाहीत, तर ‘बघून घेऊ’;वर्गणीच्या नावाखाली उकळली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:30 IST2025-09-04T16:18:59+5:302025-09-04T16:30:44+5:30
- १२०० रुपयांची पावती देऊन फोन पे क्रमांकावर पैसे पाठवण्यास सांगितले. जर पैसे दिले नाहीत, तर ‘बघून घेऊ’, अशी धमकी दिली

जर पैसे दिले नाहीत, तर ‘बघून घेऊ’;वर्गणीच्या नावाखाली उकळली खंडणी
पिंपरी : काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजिंगच्या व्यवस्थापकाला उत्सवाच्या वर्गणीच्या नावाखाली पैशांची मागणी करून धमकी देण्यात आली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी पिंपळे सौदागर येथे घडली.
अखिलेश कुमार महावीर गौतम (२५, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सचिन, अजय आणि एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादीकडे वर्गणी म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी फिर्यादीला १२०० रुपयांची पावती देऊन फोन पे क्रमांकावर पैसे पाठवण्यास सांगितले. जर पैसे दिले नाहीत, तर ‘बघून घेऊ’, अशी धमकी दिली आणि उद्या पुन्हा याच वेळी येण्याची धमकी देऊन फिर्यादीकडून १२०० रुपये रोख खंडणी म्हणून घेतली.