Video : माण फेज दोन परिसरात आगीची घटना..! भंगार मालाला आग आयटी परिसरात धुराचे लोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:32 IST2026-01-03T16:31:33+5:302026-01-03T16:32:30+5:30
आगीत कच्चा भंगार माल जळून खाक झाला असून, जवळील दोन विद्युत खांब सुद्धा कोसळ्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Video : माण फेज दोन परिसरात आगीची घटना..! भंगार मालाला आग आयटी परिसरात धुराचे लोट
हिंजवडी : माण ग्रामपंचायत हद्दीत मारुंजी बोडकेवाडी कॅनल रस्त्यालगत असलेल्या भंगार मालाला शनिवारी (दि.३) दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. आगीची तीव्रता एवढी होती की, आयटी परिसरात काळ्या कुट्ट धुराचे लोट पसरले होते. आगीत कच्चा भंगार माल जळून खाक झाला असून, जवळील दोन विद्युत खांब सुद्धा कोसळ्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, आयटी पार्क फेज दोन येथील बोडकेवाडी कॅनल रस्त्यावर ही आगीची घटना घडली. घटना समजताच आयटीपार्क परिसरातील पाच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू असून, आगीचे नक्की कारण समजू शकले नाही. मात्र, आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याने, परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
माण फेज दोन परिसरात आगीची घटना..! भंगार मालाला आग आयटी परिसरात धुराचे लोट #FIRE#PUNE#pimprichinchwadpic.twitter.com/i3mIX7Yru8
— Lokmat (@lokmat) January 3, 2026
याच रस्त्यावर अनेक भंगारमालाची दुकान आहेत, अनेक ठिकाणी पत्रशेड करून तर, काही ठिकाणी मोकळ्या मैदानात भंगार माल जमा केला जात आहे. सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून, या ठिकाणी धोकादायक रित्या मोठ्या प्रमाणात भंगार माल जमा केला जातो. याची सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा बोडकेवाडी सह परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.