रील्स पाहता पाहता लाखोंचा गंडा; पिंपळे सौदागरमध्ये स्टॉक मार्केटच्या आमिषाने ३०.७० लाखांची ऑनलाईन फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 20:14 IST2026-02-24T20:14:05+5:302026-02-24T20:14:35+5:30

इन्स्टाग्रामवर रील्स पाहत असताना त्यांना स्टॉक मार्केटमधून जलद नफा मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या जाहिराती दिसल्या.

pune crime reels show millions of fraud; Pimple Saudagar was cheated online for 30.70 lakhs with the lure of stock market | रील्स पाहता पाहता लाखोंचा गंडा; पिंपळे सौदागरमध्ये स्टॉक मार्केटच्या आमिषाने ३०.७० लाखांची ऑनलाईन फसवणूक

रील्स पाहता पाहता लाखोंचा गंडा; पिंपळे सौदागरमध्ये स्टॉक मार्केटच्या आमिषाने ३०.७० लाखांची ऑनलाईन फसवणूक

पिंपरी  : स्टॉक मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ॲपच्या माध्यमातून तब्बल ३० लाख ७० हजार ६०६ रुपये उकळल्याची धक्कादायक घटना पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली आहे. ही फसवणूक ८ ते २८ जून २०२५ या कालावधीत घडली. या प्रकरणी अंजली शर्मा, करण भगत आणि संबंधित बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पुरुष फिर्यादीने सोमवारी (दि. २३) पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इन्स्टाग्रामवर रील्स पाहत असताना त्यांना स्टॉक मार्केटमधून जलद नफा मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या जाहिराती दिसल्या. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले गेले.

संशयितांनी विशिष्ट गुंतवणूक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. “कमी कालावधीत मोठा परतावा” मिळेल, असे सांगून विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ३०.७० लाख रुपये जमा करून घेतले. सुरुवातीला ॲपवर नफा दाखवण्यात आला; मात्र प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता संपूर्ण रक्कम हडप केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी करत आहेत.

Web Title : पिंपले सौदागर में ऑनलाइन धोखाधड़ी: शेयर बाजार के लालच में ₹30.7 लाख का नुकसान

Web Summary : पिंपले सौदागर: इंस्टाग्राम रील्स पर क्लिक करने के बाद एक व्यक्ति को ऑनलाइन शेयर बाजार घोटाले में ₹30.7 लाख का नुकसान हुआ। उसे एक व्हाट्सएप ग्रुप में जोड़ा गया, एक ऐप डाउनलोड करने के लिए कहा गया, और उच्च रिटर्न के वादे के साथ विभिन्न खातों में पैसे जमा किए गए। कोई रिटर्न नहीं दिया गया।

Web Title : Online fraud in Pimple Saudagar: Lured by stock market, ₹30.7 Lakh lost.

Web Summary : Pimple Saudagar: A man lost ₹30.7 Lakh in an online stock market scam after clicking on Instagram reels. He was added to a WhatsApp group, told to download an app, and deposited money into various accounts with the promise of high returns. No returns were given.