Video: पिंपरीत भर बाजारपेठेत पोलिसालाचं लाथाबुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 21:02 IST2021-10-31T16:54:00+5:302021-11-02T21:02:59+5:30

पोलीस कर्मचारी देहूरोड बाजारात दिवाळी सणाच्या अनुषंगाने साध्या वेशात गस्त घालत होते

pune crime police beaten up in pimpri market | Video: पिंपरीत भर बाजारपेठेत पोलिसालाचं लाथाबुक्क्यांनी मारहाण

Video: पिंपरीत भर बाजारपेठेत पोलिसालाचं लाथाबुक्क्यांनी मारहाण

पिंपरी : दिवाळीच्या अनुषंगाने बाजारपेठेत साध्या वेषात गस्त घालणाऱ्या पोलिसाला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. देहूरोड येथे शनिवारी (दि. ३०) रात्री सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. 

अरविंद लक्ष्मण ढिल्लोड (रा. पारशीचाळ, देहूरोड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडेकर हे देहूरोड बाजारात दिवाळी सणाच्या अनुषंगाने साध्या वेशात गस्त घालत होते. त्यावेळी बालाजी लंच होम येथे आरोपीने शिवीगाळ करून पोलिसाशी झटापट केली. त्यांना जमिनीवर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शासकीय कामात आरोपीने अडथळा आणला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: pune crime police beaten up in pimpri market