'बाणेरहून निघाला, पत्नीला शेवटचा मेसेज केला..' पुण्यातील IT इंजिनिअरचा लोणावळ्यातील लायन्स पाॅइंटवर संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:25 IST2026-02-14T13:25:15+5:302026-02-14T13:25:41+5:30

- मयत तरुण हा पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत होता. सकाळी त्यांच्या चारचाकी वाहनाची नोंद लायन्स पॉइंट परिसरात पार्क आढळली.

Pune Crime Left Baner, sent last message to wife Pune-based IT engineer dies suspiciously at Lions Point in Lonavala | 'बाणेरहून निघाला, पत्नीला शेवटचा मेसेज केला..' पुण्यातील IT इंजिनिअरचा लोणावळ्यातील लायन्स पाॅइंटवर संशयास्पद मृत्यू

'बाणेरहून निघाला, पत्नीला शेवटचा मेसेज केला..' पुण्यातील IT इंजिनिअरचा लोणावळ्यातील लायन्स पाॅइंटवर संशयास्पद मृत्यू

लोणावळा : येथील लायन्स पॉइंटवर पुन्हा एकदा एकाने आत्महत्या केली आहे. वीरेंद्र सिन्हा (वय ३२, रा. बाणेर, पुणे) असे मयत अभियंत्याचे नाव आहे. दरीमध्ये उतरून लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम यांनी शोध मोहीम राबवली. सुमारे २५० फूट खोल दरीमध्ये एका अभियंत्याचा त्याचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुण्यातील एका आयटी अभियंत्याची कार लायन्स पॉइंटच्या दरीजवळ दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या आढळली होती. मयत तरुण हा पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत होता. सकाळी त्यांच्या चारचाकी वाहनाची नोंद लायन्स पॉइंट परिसरात पार्क आढळली. तसेच त्यांनी पहाटे मित्र आणि पत्नीला संदेश पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

यात योगेश उंबरे, महेश मसने, आयुष वर्तक, आयुष पवार, देवश्री चिले, सचिन गायकवाड, कुणाल कडू, कपिल दळवी, योगेश दळवी, सागर दळवी, सागर कुंभार, अनिल आंद्रे, गणेश भांगरे, पिंटू मानकर, महादेव भवार, गणेश म्हसकर, ज्ञानेश्वर आखाडे, संतोष मरगळे, चंद्रकांत गाडे, आनंद गावडे आदींचे मोलाचे सहकार्य केले.
 
लायन्स पॉइंट बनला सुसाईड पॉइंट

सध्या लायन्स पॉइंट हा सुसाईड पॉइंट बनू लागला आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये याठिकाणी दोन जणांनी आत्महत्या करत जीवनयात्रा संपविली आहे. यापूर्वीदेखील याठिकाणी आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. लोणावळा शहरापासून काही अंतरावर असलेल्या या पर्यटनस्थळी भविष्यामध्ये जागतिक कीर्तीचा ग्लास स्कायवॉक हा प्रकल्प उभा राहणार आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून याठिकाणी आत्महत्येच्या वेगवेगळ्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

Web Title: Pune Crime Left Baner, sent last message to wife Pune-based IT engineer dies suspiciously at Lions Point in Lonavala