Accident : भिगवणजवळ भीषण अपघात;पुणे–सोलापूर महामार्गावर कारला कंटेनरची धडक;भाजप युवानेता थोडक्यात बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:37 IST2026-03-19T13:37:14+5:302026-03-19T13:37:49+5:30

माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली.

pune accident news terrible accident near Bhigwan; Container hits Fortuner on Pune-Solapur highway | Accident : भिगवणजवळ भीषण अपघात;पुणे–सोलापूर महामार्गावर कारला कंटेनरची धडक;भाजप युवानेता थोडक्यात बचावला

Accident : भिगवणजवळ भीषण अपघात;पुणे–सोलापूर महामार्गावर कारला कंटेनरची धडक;भाजप युवानेता थोडक्यात बचावला

भिगवण (ता. इंदापूर) :पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सावंत सुदैवाने थोडक्यात बचावले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय सावंत हे बुधवारी मुंबई येथे पार पडलेल्या पत्नी व कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश सोहळ्यानंतर परंडा कडे निघाले होते. गुरुवारी पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भिगवण जवळील डाळज (नं. २) गावाच्या हद्दीत समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या फॉर्च्युनर (MH 12 SE 5559) कारला जोरदार धडक दिली.


धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की आलिशान कारच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर वाहनाचा पुढील भाग ओळखूही येत नव्हता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, या अपघातात कारचालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने धनंजय सावंत यांना गंभीर दुखापत झाली नाही.

 

Web Title : भिगवन के पास भीषण दुर्घटना; भाजपा नेता कंटेनर की टक्कर से बाल-बाल बचे

Web Summary : पुणे-सोलापुर राजमार्ग पर भिगवन के पास एक तेज रफ्तार कंटेनर ट्रक एक कार से टकरा गया। भाजपा नेता धनंजय सावंत मामूली चोटों के साथ बच गए। हादसे में कार बुरी तरह क्षतिग्रस्त हो गई। ड्राइवर और अंगरक्षक को मामूली चोटें आईं।

Web Title : Major Accident Near Bhigwan; BJP Leader Narrowly Escapes Container Collision

Web Summary : A speeding container truck collided with a car near Bhigwan on the Pune-Solapur highway. BJP leader Dhananjay Sawant survived with minor injuries. The car was severely damaged in the accident. The driver and bodyguard sustained minor injuries.