मोशीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 17:32 IST2023-08-31T17:31:06+5:302023-08-31T17:32:03+5:30
रात्री नऊच्या सुमारास स्पाईन रोड, मोशी येथे ही कारवाई केली....

मोशीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; आरोपीला अटक
पिंपरी : दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या एका महिलेला अटक केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. २९) रात्री नऊच्या सुमारास स्पाईन रोड, मोशी येथे ही कारवाई केली.
पोलिस उपनिरीक्षक विजय कांबळे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला अन्य दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपी महिला आपली उपजीविका भागवत होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. पोलिसांनी दोन महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली. तसेच आरोपी महिलेला अटक केली.