पिंपरी : राष्ट्रवादी शहर महिला आघाडीच्यावतीने शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रस्त्यावरच चूल पेटवून स्वयंपाक करत महागाईच्या मुद्यावर केंद्रातील भाजपा सरकारविरोधात निदर्शने केली.केंद्र सरकारकडून गॅस आणि इंधन यांसारख्या जीवनावश्यक वस्तुंच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. वैशाली काळभोर म्हणाल्या, सामान्य नागरिकांबद्दल या सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. कष्टकरी, श्रमिक, कामगार, छोटे व्यावसायिक असे कोणीच या शासनकर्त्यांच्या काळात सुखी नाही. सर्व त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी हे आंदोलन केले. मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. काळभोर यांच्या नेतृत्वाखाली पुष्पा शेळके,शुकंतला भाट, सुप्रिया पवार,विश्रांती पाडाळे,जयश्री पाटील, अपर्णा डोके, लता ओव्हाळ या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे रस्त्यावर चूल मांडून गॅस दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 15:24 IST
रस्त्यावरच चूल पेटवून स्वयंपाक करत महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजपा सरकारविरोधात निदर्शने केली.
राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे रस्त्यावर चूल मांडून गॅस दरवाढीचा निषेध
ठळक मुद्देसामान्य नागरिकांबद्दल या सरकारच्या संवेदना बोथट