शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025: देहूत श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:31 IST

- सोहळा ३५ दिवसांचा, संस्थानच्या वतीने वारीदरम्यान २५ ते ३० तंबूंची तयारी; शिधा व साहित्याची खरेदी

- राजेंद्र काळोखेदेहूगाव : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने ३४० व्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्णत्वास आली आहे. वारीदरम्यान २५ ते ३० तंबूंची तयारी केली आहे. शिधा व साहित्याची खरेदीही झाली आहे.पालखी सोहळ्याच्या तयारीला मार्च (फाल्गुन) महिन्यातच सुरुवात होत असते. तेव्हापासूनच साहित्याची जुळवाजुळव करण्याची सुरुवात होते. पालखी सोहळा किमान ३५ दिवसांचा असतो. या कालावधीत विविध ठिकाणी पालखीचे मुक्काम असतात. राहण्यासाठी ठिकठिकाणी राहुट्या पडतात. संस्थानच्या वतीने २५ ते ३० तंबूंची तयारी केली आहे. तंबूसाठी दोर, खुंट्या, लोखंडी पाइप याची खरेदी, दुरुस्ती व देखभाल करून झाली आहे.

श्री संत तुकाराम महाराज संस्थानची देहूकर दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी लागणारा शिधा, गॅस, पालखीसाठीचे साहित्य, टाळ-मृदंग तयार ठेवले आहेत. वारीदरम्यान १९ दिवसांच्या अन्नधान्याची खरेदी पुण्यातील मार्केट यार्डमधून झाली आहे. मंदिरात सध्या ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्यांच्या मदतीने गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदरमहाराज मोरे, सोहळा प्रमुख गणेशमहाराज मोरे, दिलीपमहाराज मोरे, वैभवमहाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंहमहाराज मोरे, लक्ष्मणमहाराज मोरे व उमेशमहाराज मोरे कामांवर लक्ष ठेवून आहेत. रथापुढे २७ आणि मागे ३९० दिंड्यातीन वर्षांपासून पालखी सोहळ्यात नवीन दिंड्यांची नोंदणी करून घेतली असल्याने यावर्षी पालखी रथापुढे २७ व मागे ३९० दिंड्या चालणार आहेत. त्यांचे चालक मालक व फडकऱ्यांना पालखी कार्यक्रमाची माहिती दिली आहे. शासकीय खात्यांशी पत्रव्यवहार पूर्ण झाला आहे.शासकीय पातळीवरही सज्जताशासकीय पातळीवरही जोरदार तयारी सुरू असून, आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने व तहसीलदार जयराज देशमुख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, चेतन कोंडे यांनी देहूत आढावा बैठका घेतल्या आहेत. पालखी रथ, गरूड टक्के, पूजेची भांडी, थाळ, पाट, चौरस, मुख्य मंदिरातील प्रभावळ, दरवाजे, चौकटींना चकाकी देण्याचे काम झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPandharpurपंढरपूरdehuदेहूAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022