शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागरचनेत जुनीच पद्धत अवलंबण्याचे गौडबंगाल

By admin | Updated: October 13, 2016 01:48 IST

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे काम सॉफ्टवेअरच्या मदतीने पार पाडले जाणार आहे, त्यामुळे त्यामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप टाळला जाणार

दीपक जाधव / पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे काम सॉफ्टवेअरच्या मदतीने पार पाडले जाणार आहे, त्यामुळे त्यामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप टाळला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. निवडणूक आयोगाकडील या सॉफ्टवेअरच्या यशस्वी चाचण्याही घेण्यात आल्या होत्या; मात्र राजकीय दबाव वाढल्यामुळे निवडणूक आयोगाला सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभागरचना करण्याचा निर्णय ऐनवेळी रद्द करावा लागल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका होणार असलेल्या सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमधील निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मार्च २०१६ मध्ये घेतली होती. त्या वेळी निवडणूक आयोगाने प्रभागरचना तयार करण्यासाठी एका सॉफ्टवेअरची यशस्वी चाचणी घेतली असून, सर्वांना प्रभागरचना तयार करण्यासाठी ते सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुका चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने, तर नगरपालिकांच्या निवडणुका दोन सदस्यांचा एक प्रभाग, या पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मे २०१६ मध्ये घेतला. निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात आली. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचे जाहीर केल्यानंतर, निवडणूक आयोगाने मुंबईमध्ये सर्व पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्येही प्रभागरचना करण्यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. अगदी आॅगस्टच्या मध्यापर्यंत निवडणूक विभागाचे अधिकारी या सॉफ्टवेअरची वाट पाहत होते; मात्र अचानक २० आॅगस्ट रोजी निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध करून जुन्याच पद्धतीने मॅन्युअली प्रभागरचना तयार करण्याचे निर्देश सर्व महापालिकांच्या निवडणूक विभागांना दिले. सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभागरचना करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली असताना, अचानक हा निर्णय बदलण्यात आला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला राजकीय वर्तुळातून मोठ्याप्रमाणात विरोध झाल्याने दबावापोटी हा निर्णय गुंडाळून ठेवण्यात आला. यामुळे एका पारदर्शक प्रक्रियेला मुकावे लागले आहे. नुकत्याच सर्व महापालिकांच्या प्रभागरचना जाहीर झाल्या आहेत. या प्रभागरचनेमध्ये सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात हस्तक्षेप केला असल्याची टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नैसर्गिक सीमांचे निकष अनेक ठिकाणी पाळण्यात आलेले नाहीत. प्रभागांची मोठ्याप्रमाणात मोडतोड करण्यात आली असून, याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल, भाजपा वगळता इतर पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.