पिंपरीत सर्व्हर डाऊन, पोस्टाचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:20 IST2019-04-11T12:19:56+5:302019-04-11T12:20:30+5:30
सर्व्हर डाऊन झाल्यानंतर पोस्टाचे कामकाज ठप्प होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत.

पिंपरीत सर्व्हर डाऊन, पोस्टाचे काम ठप्प
पिंपरी : पिंपरीतील खराळवाडी पोस्ट कार्यालयाचे कामकाज सर्व्हर डाउन झाल्याने ठप्प झाले आहे. महिन्यातून २ ते ३ वेळा ही समस्या उदभवत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
सर्व्हर डाऊन झाल्यानंतर पोस्टाचे कामकाज ठप्प होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. गुंतवणुकदार, तसेच पोस्टात अन्य कामकाजासाठी येणाऱ्यांना कामाशिवाय परत जावे लागत आहे. हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पोस्टाच्या ढिम्म कारभारामुळे ठेवीदार नाराजी व्यक्त करत आहेत. पोस्टात गुंतवणूक करण्याच्या इराद्याने आलेले अनेकजण दुसरा गुंतवणुकीचा पर्याय स्विकारत आहेत. स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट अशी महत्वाची बँक,कोर्ट यासंबधीची पत्र पाठविण्यास अडचणी येत आहेत. सर्व्हर समस्येबाबत कर्मचारी अनभीज्ञ
सर्व्हर समस्या कधी दूर होईल याबद्दल पोस्ट कर्मचारी अनभिज्ञ आहेत. काही सांगता येत नाही, असे सांगून ते मोकळे होतात. समस्या एक,दोन दिवसात दूर होईल असे निश्चित कोणीच सांगत नाही, त्यामुळे पोस्टात कामानिमित्त येणा?्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे