मॉलेडिंगच्या ऑडिशनसाठी नकार दिल्याने तरुणीला पाठविले अश्लील मेसेज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 16:26 IST2018-12-21T16:24:42+5:302018-12-21T16:26:27+5:30

मॉलेडिंगच्या ऑडिशन करण्यासाठी नकार दिल्याने तरुणीला अश्लील मेसेज पाठवून त्रास देणारया तरुणावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

The porn message sent to the girl due to she refusing to audition for modelling | मॉलेडिंगच्या ऑडिशनसाठी नकार दिल्याने तरुणीला पाठविले अश्लील मेसेज 

मॉलेडिंगच्या ऑडिशनसाठी नकार दिल्याने तरुणीला पाठविले अश्लील मेसेज 

पिंपरी : मॉलेडिंगच्या ऑडिशन करण्यासाठी नकार दिल्याने तरुणीला अश्लील मेसेज पाठवून त्रास देणारया तरुणावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


            विकी जैन असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडीत महिला घरी असताना आरोपीने त्यांना मॉडेलिंगच्या ऑडिशनसाठी फोनवरुन संपर्क साधला. परंतु, महिलेने ऑडिशनसाठी नकार दिला. त्यानंतरही आरोपीने पुन्हा महिलेला संपर्क साधला. तसेच अश्लिल मेसेज पाठवून मानसिक त्रास दिला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जैन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

Web Title: The porn message sent to the girl due to she refusing to audition for modelling