पोलीस महिलेच्या चिमुकलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; सव्वादोन वर्षांनंतर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 16:02 IST2022-11-10T16:02:22+5:302022-11-10T16:02:33+5:30

पिंपळे गुरव येथे ५ जून २०२० रोजी हा प्रकार घडला

Policewoman child abuse by father A case was registered after twenty two years | पोलीस महिलेच्या चिमुकलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; सव्वादोन वर्षांनंतर गुन्हा दाखल

पोलीस महिलेच्या चिमुकलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; सव्वादोन वर्षांनंतर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेच्या पतीने पोटच्या आठ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. पिंपळे गुरव येथे ५ जून २०२० रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी सव्वादोन वर्षांनंतर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी बुधवारी (दि. ९) फिर्याद दिली. त्यानुसार पीडित मुलीच्या वडिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पोलीस कर्मचारी आहे. तर त्यांचा पती खासगी व्यवसाय करतात. फिर्यादीच्या पतीने त्यांच्या आठ वर्षीय मुलीला भाड्याची रुम दाखविण्यासाठी व मुलीला चाॅकलेट घेऊन देतो, असे सांगून तिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर अश्लील चाळे करून मुलीवर लैंगिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Policewoman child abuse by father A case was registered after twenty two years