शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

खाकी वर्दीच 'असुरक्षित'; पिंपरीत वर्षभरामध्ये पोलिसांवरच झाले सर्वाधिक हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 15:33 IST

कोरोना काळातही घडल्या घटना : वाहतूक नियमनादरम्यान होतात वाद

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२० या वर्षामध्ये अशा प्रकारचे ५० गुन्हे दाखल

नारायण बडगुजर - 

पिंपरी : सरकारी काम अन् सहा महिने थांब, या म्हणीचा प्रत्यय शासकीय कार्यालयांमध्ये येतो. त्यामुळे हेलपाटे मारणारे नागरिक वैतागतात. त्यांचा राग अनावर होतो आणि सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ले केले जातात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२० या वर्षामध्ये अशा प्रकारचे ५० गुन्हे दाखल आहेत. त्यात पोलिसांवर ४१ हल्ले झाले असून सर्वाधिक वाहतूक पोलिसांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले.

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले. त्यामुळे पोलिसांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. त्यांच्या कामाचे कौतुकही झाले. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी मदतीचेही हात पुढे आले. मात्र त्याचवेळी काही नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करीत पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तर काही नागरिकांनी थेट पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. तसेच इतर सरकारी कर्मचाऱ्यांवरही हल्ले झाले. महावितरण कंपनी, महसूल विभाग यासह विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात आले.

वाहतूक विभाग टार्गेटपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून पुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती मार्ग, मुंबई -बेंगळुरू महामार्ग, पुणे - नाशिक महामार्ग, तळेगाव - चाकण - शिक्रापूर राज्यमहामार्ग जातात. या मार्गांसह शहरात ठिकठिकाणी वाहतूक नियमनाची आवश्यकता असते. बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. अशा वेळी वाहनचालक पोलिसांशी हुज्जत घालतात. तसेच त्यांच्या कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना मारहाण करतात. वर्षभरात वाहतूक पोलिसांवर सर्वाधिक हल्ले झाले.

चारचाकीच्या बोनटवर नेले फरफटतचिंचवड येथील चापेकर चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला चारचाकी वाहनचालकाने त्याच्या वाहनाच्या बोनटवर फरपटत नेले होते. सुदैवाने यातून संबंधित वाहतूक पोलीस बचावला. वाहन थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले              २०१९ (नोव्हेंबरपर्यंत)          २०२०पोलीस    ३३                                         ४१इतर        १६                                          ९एकूण      ४९                                         ५०

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस