पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा ‘गोल्डमन’ला दणका; काळ्या काचांप्रकरणी धडाकेबाज कारवाई

By नारायण बडगुजर | Published: March 31, 2024 07:09 PM2024-03-31T19:09:59+5:302024-03-31T19:10:09+5:30

वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे

Pimpri Chinchwad traffic police hit Goldman Bold action in case of black glasses | पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा ‘गोल्डमन’ला दणका; काळ्या काचांप्रकरणी धडाकेबाज कारवाई

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा ‘गोल्डमन’ला दणका; काळ्या काचांप्रकरणी धडाकेबाज कारवाई

पिंपरी : बेशिस्त वाहनचालक तसेच काळ्या काचा असलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी शनिवारी (दि. ३०) धडक कारवाई केली. वाकड येथील फिनिक्स माॅल परिसरात व थेरगाव येथील पदमजी पेपर मिल परिसरात ही कारवाई केली. यात ४०६ वाहनांवर कारवाई करून चार लाख ३७ लाखांचा दंड आकारला. यात शहरातील ‘गोल्डमन’ म्हणून ओळख असलेल्या वाहनचालकाच्या वाहनावरही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

वाकड येथील फिनिक्स माॅल परिसरात दिवसभरात ३०५ वाहनांवर दोन लाख ५०० दंड आकारला. चारचाकी वाहनांच्या काळ्या काचांवर कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा केलेल्या कारवाईत ५०० रुपये दंड आकारला. त्यानंतरही काळ्या काचा आढळून आल्यास संबंधित वाहनावर १५०० रुपये दंड आकारण्यात येतो. यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पदमजी पेपर मिल समोरील रस्त्यावर बेशिस्तपणे पार्क होणाऱ्या ४७ वाहनांवर कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड आकारला.

‘गोल्डन गाईज’ची काळी फिल्म हटवली

‘गोल्डन गाईज’ म्हणून शहरात महागडी आलिशान चारचाकी वाहन घेऊन फिरणाऱ्या वाहन चालकालाही वाहतूक पोलिसांनी दणका दिला. संबंधित वाहनचालकाने त्याच्या या चारचाकी वाहनाला सोन्याची पाॅलिश केले असल्याचे सांगण्यात येते. तसेच ‘गोल्डमन’ म्हणून संबंधित वाहनधारकाची ओळख आहे. त्याच्या या ‘गोल्डन’ चारचाकीत हायप्रोफाइल व्यक्ती तसेच सेलिब्रिटी नेहमीच दिसून येतात. तसेच ही गोल्डन चारचाकी शहरात कुठेही दिसल्यास बघ्यांची गर्दी होते. 

पोलिसांची ‘गोल्डन’ कारवाई व्हायरल

गोल्डमनच्या गोल्डन चारचाकी वाहनावर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. कारवाई करतानाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईची चर्चा शहरात रंगली होती.  

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. ही कारवाई यापुढेही सातत्याने चालूच राहणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. - विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

Web Title: Pimpri Chinchwad traffic police hit Goldman Bold action in case of black glasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.