पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १८ झोनपैकी वाकड विभागीय कार्यालयाने सर्वाधिक ११७ कोटी १८ लाख ३८ हजार ९११ रुपयांची करवसुलीकरत अव्वल स्थान पटकावले. अभय योजना, थकबाकीसाठी पाठपुरावा तसेच कारवाई आणि नागरिकांना दिलेल्या सुलभ सुविधांमुळे वाकड झोनने यंदा सर्वाधिक महसूल मिळवला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात ९४७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करून पुन्हा एकदा उच्चांक प्रस्थापित केला आहे. महापालिकेने दुसऱ्यांदा साडेनऊशे कोटींचा टप्पा पार केला. शहरातील सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांपैकी ६ लाख २७ हजार ७९० मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. गतवर्षी कर संकलन विभागाने ९४० कोटी रुपयांचा कर वसूल केला होता. यंदा महापालिका निवडणुकीच्या कामात विभागातील कर्मचारी तब्बल तीन महिने गुंतले होते. त्यामुळे वसुलीवर काही प्रमाणात परिणाम झाला. अन्यथा यंदा एक हजार कोटींचा टप्पाही पार करता आला असते, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
------
चिंचवड मतदारसंघातून अधिक वसुली
चिंचवड मतदारसंघातून वाकडनंतर थेरगाव झोनने ९७ कोटी ६१ लाख ३३ हजार ९९३ रुपये, तर चिंचवड झोनने ७७ कोटी ३४ लाख ६८ हजार ८२४ रुपये कर वसूल केला. किवळे झोनने ६४ कोटी ८९ लाख ७८ हजार ७१९ रुपये वसुली केली. तर भोसरी मतदारसंघातून चिखली झोनने ६७ कोटी ६० लाख ८५ हजार ५९१ रुपये, भोसरी झोनने ६३ कोटी ६९ लाख ८२ हजार ४५६ रुपये, तर मोशी झोनने ६२ कोटी ५८ लाख ३० हजार ७८६ रुपये कर वसूल करत आघाडीच्या झोनमध्ये स्थान मिळवले. कर संकलन विभागाच्या एकूण विक्रमी कामगिरीत चिंचवड मतदारसंघातील झोनचा प्रमुख झोनचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-----------
अभय योजनेतून ४५ कोटी १३ लाखांची सवलत
महापालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. १ ते ३१ मार्च या कालावधीत ८३ हजार ४७० थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला. ३१ दिवसांत १९७ कोटी १८ लाख रुपयांचा कर वसूल झाला. या योजनेंतर्गत नागरिकांना ४५ कोटी १३ लाख रुपयांची सवलत मिळाली.
---------
कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी
औद्योगिक : ४ हजार ७८३
निवासी : ५ लाख ५२ हजार ४२
बिगरनिवासी : ५२ हजार २११
मिश्र :१३ हजार ६७४
मोकळी जमीन : ५ हजार ४९
इतर : ३१
एकूण : ६ लाख २७ हजार ७९०
-------
असा आला रुपया...
ऑनलाइन : ७०६ कोटी ७२ लाख
रोख : ८३ कोटी ८८ लाख
धनादेशाद्वारे : ११० कोटी ५२ लाख
ईडीसी : ६ लाख
डीडी : ७ कोटी ९ लाख
महापालिकेच्या आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे साडेनऊशे कोटींचा टप्पा पार झाला. या वर्षासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले जाईल. अभय योजना लागू करण्याबाबत पुनर्विचार करणे सुरू आहे. – तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
Web Summary : Wakad zone led Pimpri-Chinchwad's tax collection with ₹117.18 crore, aided by amnesty schemes. The corporation collected ₹947 crore property tax, nearly reaching ₹1000 crore despite election duties. Chinchwad constituency zones contributed significantly. An amnesty scheme provided ₹45.13 crore relief to 83,470 defaulters.
Web Summary : वाकड जोन ने माफी योजनाओं की मदद से ₹117.18 करोड़ के साथ पिंपरी-चिंचवड के कर संग्रह का नेतृत्व किया। निगम ने चुनाव ड्यूटी के बावजूद ₹947 करोड़ संपत्ति कर एकत्र किया, जो लगभग ₹1000 करोड़ तक पहुँच गया। चिंचवड निर्वाचन क्षेत्र के क्षेत्रों ने महत्वपूर्ण योगदान दिया। एक माफी योजना ने 83,470 चूककर्ताओं को ₹45.13 करोड़ की राहत प्रदान की।