सातारा जिल्ह्यातून ' मोका ' तील आरोपींना पिंपरी पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 19:31 IST2019-12-18T19:21:32+5:302019-12-18T19:31:35+5:30

दोन आरोपी चार महिन्यांपासून फरार

Pimpri-Chinchwad police arrested 'Moka' from Satara district | सातारा जिल्ह्यातून ' मोका ' तील आरोपींना पिंपरी पोलिसांनी केली अटक

सातारा जिल्ह्यातून ' मोका ' तील आरोपींना पिंपरी पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्देसातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील बनवडी येथून जेरबंद गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी चार महिन्यांपासून फरार होते. त्यांना सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील बनवडी येथून जेरबंद करण्यात पिंपरी-चिंचवडपोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास उर्फ  बाळ्या गोपाळ लोखंडे (वय २२) व ताजुद्दीन उर्फ  ताज वद्रुद्दीन शेख (वय २५, दोघेही रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी लोखंडे व शेख यांच्या विरोधात मोकाअंतर्गत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र चार महिन्यांपासून दोघेही आरोपी फरार होते. सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील बनवडी येथे हरूण बद्रुदीन नाईक (पठाण) यांच्या घरी दोघेही आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक बनवडी येथे रवाना झाले. दोन्ही आरोपींना तेथून ताब्यात घेण्यात आले. साथीदारांसह त्यांनी गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपी विकास लोखंडे याच्यावर हिंजवडी, वाकड, खडकी या पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी शेख याच्यावरही वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 
सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी-दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, आशिष बोटके, निशांत काळे, उमेश पुलगम, किरण काटकर व सागर शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: Pimpri-Chinchwad police arrested 'Moka' from Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.