शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडसाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:09 IST

- ग्रामीण भागासह औद्योगिक क्षेत्राकडून मागणी : पुण्यातील कार्यालयात जाण्यासाठी करावी लागते कसरत; शहर आणि परिसराच्या विस्ताराचा भार कसा पेलणार?

गोविंद बर्गे पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील औद्योगिक क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. मात्र, या भागातील विजेच्या मोठ्या भारांच्या जोडणीसाठी मंजुरी, खांब आणि वाहिनीचे स्थलांतर आणि तत्सम कामांसाठी पुण्यातील कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे महावितरणने भोसरी, पिंपरी, राजगुरुनगर आणि मावळ विभाग मिळून स्वतंत्र पिंपरी-चिंचवड मंडल कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या शहरात महावितरणची पिंपरी व भोसरी अशी दोन विभागीय कार्यालये आहेत. ही कार्यालये पुण्यातील गणेशखिंड मंडल कार्यालयाशी संलग्न आहेत. या दोन्ही विभागांत ग्राहकसंख्या झपाट्याने वाढत असून, सेवांवरील ताणही वाढत आहे. त्यामुळे सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही वाढत आहेत. त्याचा घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना फटका बसत आहे. मावळ परिसराला महावितरणच्या राजगुरुनगर विभागीय कार्यालयातून सेवा पुरवली जाते. हे कार्यालय पुण्यातील रास्तापेठ मंडल कार्यालयाशी जोडलेले आहे. तेथे पोहोचण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहकांना जास्त अंतर पार करावे लागते. यात वेळ आणि पैसा खर्च होत आहे. या कामांसाठी गाठावे लागते पुण्यातील कार्यालय

लोणावळा येथून रास्ता पेठेतील कार्यालयाचे अंतर ६६ किलोमीटर, तर राजगुरुनगरपासून ४० किलोमीटर आहे. पिंपरी येथून गणेश खिंड महावितरण कार्यालयाचे अंतर १५ किलोमीटर आहे. या दोन्ही कार्यालयांत गृहसंकुले, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना १५० किलोवॅटपेक्षा अधिक विद्युत भाराच्या कनेक्शनच्या मंजुरीसाठी, तसेच विद्युत खांब आणि वाहिनीचे स्थलांतर, उच्चदाब विद्युत वाहिन्यांशी संबंधित अन्य कामांसाठी जावे लागते. 

पिंपरी-चिंचवडमध्ये महावितरणचे मंडल कार्यालय सुरू करावे. तेथे शहरातील दोन विभागांसह राजगुरुनगर विभागीय कार्यालयाचा समावेश करावा, अशी मागणी महावितरणचे मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक राजेंद्र पवार यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  -ॲड. गिरीश बक्षी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन.   

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र मंडल कार्यालयाची मागणी तीन वर्षांपासून करीत आहे. कारण किरकोळ कामांसाठी गणेशखिंड आणि रास्ता पेठ कार्यालयात ये-जा करावी लागते. अधिकारी न भेटल्यास हेलपाटेही मारावे लागतात. - संतोष सौंदणकर, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती. 

गणेश खिंड येथील कार्यालयात जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागते. पार्किंगची समस्या भेडसावते. त्यामुळे लघुउद्योजकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शहरातच स्वतंत्र मंडल कार्यालय सुरू झाल्यास हा त्रास कमी होईल. महावितरणची कार्यक्षमताही सुधारेल.  - नितीन गट्टानी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड प्लास्टिक असोसिएशन.  

English
हिंदी सारांश
Web Title : Independent Division Office for Pimpri-Chinchwad Mahavitran Likely?

Web Summary : Demand grows for a separate Mahavitran division in Pimpri-Chinchwad due to industrial expansion. Currently, residents must travel to Pune for approvals, causing delays and inconvenience. A local office would improve efficiency and service delivery for the area's growing customer base.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे