पिंपरी : घरगुती गणपतींचे विसर्जन करून उद्योगनगरीतील पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सोमवारी साकारलेले जिवंत आणि हलते देखावे पाहण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सामाजिक, राजकीय, धार्मिक, पौराणिक विषयावरील देखाव्यांवर भर दिला आहे, तर शहरातील मुख्य चौक आणि वाहतुकीचे नियोजन केले असून सोहळ्यावर सीसीटीव्हीची असल्याचे दिसून आले. नजर पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी गौरी आगमन झाले. त्यानंतर रात्री उपनगरातील देखावे पाहण्यासाठी भाविक घराबाहेर पडले होते. त्यामुळे प्रचंड गर्दीचा अनुभव आला. रात्री दहानंतर देखावे बंद करण्यात आले. गणेशोत्सवाचा आज सोमवारी सहावा दिवस होता.
घराघरात गौरी पूजन केले. नैवेद्य दाखविला. सायंकाळी सातनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखावे खुले केले. शहरातील गणेश मंडळांनी यंदा सामाजिक संदेश देण्याबरोबरच सद्यःस्थितीवर आधारित विषयावरील हलते आणि जिवंत देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
या भागात होतेय गर्दी शहरातील गावठाणांच्या परिसरात गर्दी अधिक दिसून आली. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्गही देखावे पाहण्यासाठी आले होते. चिंचवड स्टेशन येथील रेल्वे लाइनच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरील उत्सवात, त्याचबरोबर काळभोरनगर येथील हनुमान पुतळा येथील मंडळाच्या ठिकाणी तोबा गर्दी झाली होती. भोसरी गावठाण, नेहरूनगर रस्ता, निगडी, आकुर्डी आणि चिंचवडगावातील गांधी पेठ, चापेकर चौक रस्ता, मोरया गोसावी मंदिर रस्ता, पिंपरी गावठाणातील रस्त्यावर गर्दी झाली होती.
वाहतूक कोंडी रोखली, पोलिसांकडून बंदोबस्तचौकातील रस्ते असले तरी वाहतूककोंडी होणार नाही, याची दक्षता मंडळांनी घेतली होती. मुख्य रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. रात्री जस-जशी गर्दी वाढू लागली तसे मध्यवर्ती भागात बॅरिकेड लावून वाहनांसाठी रस्ते बंद केले होते. सुरक्षिततेच्या कडेकोट बंदोबस्त होता.
मेट्रो, रेल्वे, बसलाही गर्दीगणेशोत्सवासाठी मध्यरात्री दोनपर्यंत वाहतूक सुरू ठेवली आहे. पीएमपीनेही फेऱ्या वाढविल्या आहेत. दीड आणि पाच दिवसांच्या घरगुती गणरायांचे विसर्जन केल्यानंतर आणि गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या दिवसात भक्त पुण्यातील देखावे पाहण्यास पसंती देतात. त्यामुळे मेट्रोने आणि रेल्वेने पुण्यात जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. तसेच तळेगाव, लोणावळा, कामशेत, देहूगाव या भागातूनही पिंपरी आणि चिंचवडमधील देखावे पाहण्यासाठी नागरिक आल्याचे दिसले.