अफगाण तरुणाचे अवैधपणे भारतात वास्तव्य; तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:01 IST2025-04-11T15:58:11+5:302025-04-11T16:01:32+5:30
हिंजवडी येथील एका सोसायटी मध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होता

अफगाण तरुणाचे अवैधपणे भारतात वास्तव्य; तरुणाला अटक
पिंपरी : अफगाणिस्तान येथील तरुणाने भारतात अवैधपणे वास्तव्य केले. व्हिसाची मुदत दोन वर्षांपूर्वी संपलेली असतानाही अधिक वेळ वास्तव्य केल्याबाबत एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (१० एप्रिल) हिंजवडी येथे करण्यात आली. फैजल साफी (२९, हिंजवडी. मूळ रा. अफगाणिस्तान) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फैजल साफी याच्या व्हिसाची मुदत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपली आहे. त्यानंतर देखील त्याने भारतात वास्तव्य केले. तो २३ फेब्रुवारी २०२४ पासून हिंजवडी येथील एका सोसायटी मध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होता.
याबाबत पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई केली. त्याला अटक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.