फोटोसाठी स्टंट केला, १६ वर्षांचा वेदांत नदीत पडला अन्...; दापोडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:05 IST2025-06-22T13:04:57+5:302025-06-22T13:05:44+5:30
वेदांत बोत्रे हा शुक्रवारी (दि. २०) दुपारी मुळा नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलावरून जुन्या पुलावर उडी मारून फोटोसाठी स्टंट करत होता. त्या वेळी तोल गेल्याने तो थेट नदीत कोसळला.

फोटोसाठी स्टंट केला, १६ वर्षांचा वेदांत नदीत पडला अन्...; दापोडी येथील घटना
पिंपरी : फोटोसाठी स्टंट करताना मुळा नदीच्या पुलावरून एक १६ वर्षीय मुलगा नदीपात्रात पडला. त्या वेळी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी नदीपात्रालगत तैनात असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी संबंधित मुलाला सुखरूप बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी दापोडी येथे घडली. वेदांत बोत्रे (१६) असे नदीत पडलेल्या मुलाचे नाव आहे.
वेदांत बोत्रे हा शुक्रवारी (दि. २०) दुपारी मुळा नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलावरून जुन्या पुलावर उडी मारून फोटोसाठी स्टंट करत होता. त्या वेळी तोल गेल्याने तो थेट नदीत कोसळला.
त्या वेळी नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने वेदांत वाहत जाऊन पूल बांधणीसाठी असलेल्या लोखंडी कॉलममध्ये अडकला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी वेदांत याला सुखरूप नदीबाहेर काढून पालकांच्या स्वाधीन केले. अग्निशामक दलाचे उपअधिकारी गौतम इंगवले, विकास नाईक, रूपेश जाधव, प्रथमेश भोसले, फायरमन विशाल चव्हाण आणि आविष्कार पिसाळ आदी जवानांनी या कारवाईत सहभागी होते.