Video : पिण्याच्या पाण्यात अळ्या; पिंपरी शहरातील अनेक भागांत दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:32 IST2026-04-09T13:03:42+5:302026-04-09T13:32:29+5:30

Pimpari-chinchwad Water pollution -नळातून येणाऱ्या पाण्यात जिवंत अळ्या आढळल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Pimpari-chinchwad Water pollution Larvae in drinking water; Contaminated water supply in many parts of the city is playing with the health of citizens: Administration is not serious | Video : पिण्याच्या पाण्यात अळ्या; पिंपरी शहरातील अनेक भागांत दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Video : पिण्याच्या पाण्यात अळ्या; पिंपरी शहरातील अनेक भागांत दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

पिंपरी : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संत तुकाराम नगर, लांडेवाडी, फुलेनगर, आकुर्डी, चिखली आणि कुदळवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्यात अळ्या सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नळातून येणाऱ्या पाण्यात जिवंत अळ्या आढळल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी नळाचे पाणी भांड्यात भरल्यानंतर त्यामध्ये लहान अळ्या दिसल्या आहेत. काही भागांत पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त येत असल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी करणे धोकादायक ठरत असल्याची भीती व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलवाहिन्या, उंच पाण्याच्या टाक्या आणि व्हाॅल्व्ह पॉइंटची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे अपेक्षित असताना, संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

 पाण्याचे नमुने तपासा...

दरम्यान, या घटनेमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, महापालिका प्रशासनाने तातडीने नमुने तपासणी करून नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

काहीवेळा जलवाहिन्या तुटलेल्या असतात. बाहेरील पाणी जलवाहिन्यांमध्ये समाविष्ट होते. त्यातून पुरवठा झाला असेल. त्यावर तातडीने उपाययोजना करायला सांगितल्या आहेत. एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे लिकेज सापडत नाहीत.

Web Title : पिंपरी में दूषित पानी की आपूर्ति; कीड़े मिले, स्वास्थ्य खतरे में

Web Summary : पिंपरी में कई इलाकों में दूषित पानी की आपूर्ति हो रही है, पानी में कीड़े पाए गए हैं। निवासियों को दूषित पानी से स्वास्थ्य संबंधी खतरों का डर है। रखरखाव में लापरवाही का संदेह है। तत्काल परीक्षण और सुरक्षित पानी की आपूर्ति की मांग की गई है।

Web Title : Contaminated Water Supply in Pimpri; Worms Found, Health at Risk

Web Summary : Pimpri faces contaminated water supply with worms found in several areas. Residents fear health risks due to the polluted water. Negligence in maintenance is suspected. Immediate testing and safe water supply are demanded.