हिंजवडीतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मेट्रोचे काम नसल्याचा प्रशासनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:30 IST2026-04-09T17:30:15+5:302026-04-09T17:30:52+5:30

भूमिगत वीज वाहिनीचे नुकसान झाल्यामुळे याशविन हाउसिंग सोसायटीच्या रहिवाशांना त्रास झाला.

pimpari-chinchwad the administration claims that the power outage in Hinjewadi is not due to metro work. | हिंजवडीतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मेट्रोचे काम नसल्याचा प्रशासनाचा दावा

हिंजवडीतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मेट्रोचे काम नसल्याचा प्रशासनाचा दावा

पिंपरी : हिंजवडी येथील याशविन हाउसिंग सोसायटी परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्यामागे शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो कामाचा काहीही संबंध नाही, असा दावा मेट्रो प्रशासनाने केला असून मेट्रो कामासाठी हिंजवडी मार्गावरील सर्व युटिलिटी केबल्स उत्खननाच्या खूप आधीच स्थलांतरित केल्या होत्या. संबंधित ठिकाणचे काम बिघाड झाल्याच्या चार ते पाच दिवस आधीच पूर्ण झाले होते, असे ‘पीआयटीसीएमआरएल’ प्रशासनाचे म्हणणे आहे.

भूमिगत वीज वाहिनीचे नुकसान झाल्यामुळे याशविन हाउसिंग सोसायटीच्या रहिवाशांना त्रास झाला. मेट्रोचे सुरू असलेले बांधकाम याचे कारण असल्याचे ‘एमएसईबी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, मेट्रो प्रशासनाने विद्युत बिघाडाच्या ठिकाणी मेट्रोशी संबंधित उत्खननाचा कोणताही राडारोडा नव्हता.

परिसरात दिसणारे काँक्रीटचे साहित्य हे पूर्वीच्या कामांमधील आधीपासूनच असलेला राडारोडा आहे. मेट्रोच्या कामाचा वीजपुरवठा खंडित होण्याशी मेट्रोचा काहीही संबंध नाही. सध्याच्या युटिलिटीजच्या बाबतीत मेट्रो योग्य ती खबरदारी घेत आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले.

Web Title : हिंजवडी बिजली कटौती से मेट्रो का इनकार, उपयोगिता क्षति को बताया कारण।

Web Summary : मेट्रो अधिकारियों ने हिंजवडी बिजली कटौती का कारण अपने काम को मानने से इनकार किया। उनका दावा है कि खुदाई से पहले ही यूटिलिटी केबल स्थानांतरित कर दिए गए थे और कटौती से पहले साइट का काम पूरा हो गया था। अधिकारियों के अनुसार, बिजली कटौती क्षतिग्रस्त भूमिगत केबलों के कारण हुई, जो मेट्रो निर्माण से असंबंधित है।

Web Title : Metro denies link to Hinjewadi power outage, blames utility damage.

Web Summary : Metro authorities deny their work caused the Hinjewadi power outage. They claim utility cables were relocated before excavation and the site work was completed prior to the outage. The power cut was due to damaged underground cables, unrelated to ongoing metro construction, according to officials.